संजय शिंदे यांना माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

सातारा : राज्यातील बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

संजय शिंदे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच माढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि आ.बबनदादा शिंदे यांचे बंधू आहेत. त्यांनी सन.2014 विधानसभा निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजपकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे तर आता राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच मोहिते व शिंदे दोन्ही घराणी राजकीय दृष्ट्या दिग्गज मानली जातात. त्यामुळे साहजिकच निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)