संजय राऊतांची ऑफर राधाकृष्ण विखे पाटील स्विकारणार का?

मुंबई – सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं शिवसेनेने स्वागत केलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, तिसरी पिढी भाजपसोबत जाते, चांगली गोष्ट आहे. यामागे काय तडजोड झाली मला माहित नाही. आता तुम्ही शिवसेनेत यावं आणि युती मजबूत करावी अशी ऑफर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेस सोडली होती. ते राजकारणात इतकी वर्षे असतानाही मंत्रिपद मिळालं नव्हतं, तेव्हा शिवसेनेने ते दिलं होतं. शिवसेना-भाजप युतीवेळी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांनी आता तपासावं. घर सांभाळू शकत नाहीत. त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो, उद्धव ठाकरेंवर टीका करताना भान ठेवायला हवं होतं. भविष्यात काय वाढून ठेवलंय ते बघायला हवं होतं. त्यांना आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. राधाकृष्ण विखेंनी आता शिवसेनेत यावे.

दरम्यान, अहमदनगर जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील नाराज होते. विखे पाटील दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले होते. अंतर्मनाचाआवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, असं सूचक वक्तव्य विखे पाटलांनी केलं होतं. त्यामुळे आता संजय राऊतांनी दिलेली आॅफर राधाकृष्ण विखे पाटील स्विकारणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, संजय राऊत यांच्या या आॅफर बदल अद्याप राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)