कार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर

नवी दिल्ली – विश्‍वचषकाच्या दृष्टीने तयारी करिता अखेरची संधी असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला स्थान मिळाले नाही, त्याच्या जागी संघात ऋषभ पंतची निवड करण्यात आल्याने दिनेश कार्तिकची एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्द जवळपास संपुष्टात आली असल्याचे प्रतिपादन भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी केले आहे.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड न झाल्यामुळे दिनेश कार्तिकच्या चाहत्यांना वाईट वाटणे साहजिकच आहे. आतापर्यंत त्याला ज्या ज्या सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, त्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. मात्र एकदिवसीय मालिकेसाठी निवड न झाल्यामुळे यापुढे दिनेश कार्तिकचा फक्त टी-20 मालिकेसाठी विचार केला जाईल. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधली कारकिर्द आता जवळपास संपुष्टात आली आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
3 :blush:
3 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)