‘संजू’ नंतर संजय दत्त लिहतोय आत्मचरित्र… ‘या’ तारखेला होणार प्रकाशित

 ‘संजूला’ मिळालेल्या अफाट यशानंतर (संजूचा #moviereview वाचण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा) आता बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्त उर्फ बाबा आत्मचरित्र लिहणार आहे. हार्पर-कॉलिन्स ही प्रसिद्ध पुस्तक प्रकाशक संस्था संजूबाबाची आत्मकथा प्रकाशित करणार आहे. पुढील वर्षी संजय दत्त ६०वर्षांचा होत असल्याने त्याची आत्मकथा त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २९ जुलै २०१९ला प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना संजय दत्तने आत्मकथा लिहीत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून आपण आजपर्यंत कोणाशीही ‘शेअर’ न केलेले प्रसंग या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे संजय दत्तने म्हंटले आहे. “मला एक असाधारण आयुष्य जगायला मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो, माझं आयुष्य म्हणजे जणू काही तीव्र चढ-उतारांची मालिकाच आहे. आयुष्यात पराकोटीचे सुख आणि दुःख भोगले असल्याने माझ्याकडे वाचकांना सांगण्याजोगे खुपसारे किस्से आहेत” असे देखील तो म्हणाला.‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)