बांधकाम व्यावसायिक संजय अग्रवाल यांची आत्महत्या

मुंबई; चेंबूर सिंधी कॉलनीतील कार्यालयात संजय अग्रवाल यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाड़ून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांचा मुलगा, नातेवाईक त्यांच्या केबिनबाहेर होते.

चेंबूरमधले प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल हे संजोना विकासकचे मालक आहेत. घटनेची माहिती मिळताच, चेंबूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजय अग्रवाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक ताब्यात घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंपूर्ण घटनेविरोधात आत्महत्येचा गुन्हा चेंबूर पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संजय हे मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आता त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

गेल्या वर्षभरापासून बिल्डर आणि बांधकाम क्षेत्रातली प्रगती मंदावली आहे. त्यामुळे संजय हे आर्थिक अडचणींमध्ये होते, अशा चर्चा आहे. त्यामुळे मानसिक तणावाखाली येत संजय अग्रवाल यांनी ही टोकाची भूमिका का घेतली असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)