सांगली – जत तालुक्यातील शेगाव येथे एक अशी घटना घडली की त्या घटनेचं सर्वत्र कौतुक होत आहे. बंधूप्रेमासह मुलीची गरज या घटनेतून समोर येत आहे. दोघा भावांनी आपल्या एकमेकांचे मुल दत्तक घेऊन एक आगळावेगळा आदर्श जगासमोर मांडला आहे. बिरूदेव आणि आप्पासाहेब अशी दोघा भावांची नावे आहेत. त्यांनी आपल्या मुले परस्पर दत्तक घेतल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, बिरूदेव यांना दोन मुलगे आहेत तर आप्पासाहेब यांना दोन मुली आहेत. दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी असावी अशी इच्छा होती. मग काय दोघांनी पत्नींची संमती घेऊन परस्पर मुले दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानुसार बिरूदेव यांनी आपला भाऊ आप्पासाहेब यांच्या आरूषला दत्तक घेतले तर आप्पासाहेब यांची मुलगी अन्विताला बिरूदेव यांनी आपल्या घरी लक्ष्मी म्हणून दत्तक घेतले. दोन्ही भावांचे कुटुंब आता परिपूर्ण झाले असून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. नातेवाईंच्या उपस्थितीत हा दत्तक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. आजकाल आपल्याला भावांमध्ये भाडणे झाल्याची उदाहरणे पाहायला मिळतात मात्र या भावांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची राज्यात चर्चा होत आहे.
बिरूदेव त्यांची पत्नी आणि मुले भाऊ आप्पासाहेब त्यांची पत्नी आणि मुले आणि त्यांचे आई-वडील असे सर्व कुटुंब एकत्र राहतात. दोघांनाही मुलगा आणि मुलीची गरज होती त्यामुळे त्यांनी घरातच एकमेकांची मुले दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आणि मुलगा मुलगी असण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दोघांची मुले घरभर एकत्र बागडताना पाहून बिरूदेव यांना दत्तकची कल्पना सुचली. आप्पासाहेबलाही पटली. त्यांच्या कल्पनेला सौभाग्यवतींनी आनंदाने संमती दिली. बिरूदेव यांचा आरुष आप्पासाहेबांनी स्वीकारला. आप्पासाहेबांच्या नवजात अन्विताला बिरूदेव यांनी आपलीशी केली. या कुटुंबाचे कौतुक सर्वत्र होत आहे.