नगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल

नगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संग्राम जगताप यांनी पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकरी बबनराव रासकर आणि त्यांच्या पत्नी सौ.अंजनाबाई रासकर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दरम्यान, नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी जोरदार शक्‍तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)