संगमनेरमध्ये ‘ट्रॅक्‍टर पोळा’ साजरा

संगमनेर – कृषिप्रधान संस्कृतीत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो; परंतु कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे यांत्रिक शेतीवर भर देण्यात येत आहे. याचा प्रत्यय संगमनेर तालुक्‍यातील सावरगावतळ येथे बैलांऐवजी यावर्षी पहिल्यांदाच ट्रॅक्‍टरचाच पोळा भरविण्यात आला.

ट्रॅक्‍टर हे शेतीतील अत्यंत उपयोगी यंत्र असल्याने सावरगावतळ गावात ट्रॅक्‍टरलाच बैल म्हणून ट्रॅक्‍टरचा पोळा मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. शेतीत सध्या बैलजोड्या शेतकऱ्यांसाठी खर्चिक होत चालले असून, पशुधन जगवण्याएवढी ऐपत नसल्याने अलिकडच्या काळात शेतीत बैलांऐवजी ट्रॅक्‍टरचा वापर केला जात आहे. सावरगावतळ परिसरात शेतीसाठी मागील एक दशकापासून मोठ्या संख्यने ट्रॅक्‍टरचाच वापर केला जात आहे.या काढण्यात आलेल्या मिरवणुकीत 200 ट्रॅक्‍टर सहभागी झाले होते.

ट्रॅक्‍टरची पूजा करून गावात मिरवणूक काढली. ही परंपरा जोपासताना गावात बैलांप्रमाणेच ट्रॅक्‍टरची सजावट केली होती. एका रांगेत ट्रॅक्‍टरला उभे करून ट्रॅक्‍टरची परंपरेनुसार गावातील सर्व पदाधिकारी मंडळींच्या हस्ते पूजन केले गेले. यावेळी पूजेनंतर ट्रॅक्‍टरची गावातून मिरवणूक काढली गेली. ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली डाळिंब फोडून परंपरेप्रमाणे ट्रॅक्‍टरला नैवेद्यदेखील दाखवला गेला.यंदा पहिल्यांदाच थाटामाटात ट्रॅक्‍टरचा पोळा साजरा करण्यात आला.

आधुनिक युगात बैलांची जागा ट्रॅक्‍टर सारख्या मशीनने घेतली आहे. ही बाब जेवढी चांगली आहे तेवढीच पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक देखील आहे. दिवसेंदिवस पशुधनाची घटती संख्या हा चिंतेचा विषय असून आधुनिकतेबरोबरच शेतकऱ्यांनी पशुधन सांभाळणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)