संगमनेर तालुक्‍यातील खंडेरायवाडीतील शेतकरी हताश

वरुणराजा तर रुसलाच, शेतमालालाही कवडीमोल भाव

संगमनेर  – पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा बसरला नाही, त्यातच शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. टोमॅटोला प्रतिकिलो अडीच रुपये तर झेंडूच्या फुलाला सात रुपये भाव मिळत असल्याने गुंतविलेले भांडवलही वसूल होत नाही. त्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संगमनेर तालुक्‍यातील खंडेरायवाडी येथील शेतकऱ्याने पाच एक टोमॅटो, अडीच एकर झेंडूत अक्षरश: मेंढ्या सोडल्या.
संगमनेर तालुक्‍यातील पठार भागातील बहुतांश गावे अवर्षणग्रस्तच. नदी व पाण्याचा स्त्रोत नसल्याने पाण्याचे व्यवस्थापन करून बहुतांश शेतकऱ्यांरी इतर पिकांबरोबर टोमॅटो व झेंडूची पिके घेत आहेत. या वर्षी सुरुवातीला पाऊस झाल्याने खंडेरायवाडी येथील जयराम धोंडीबा ढेरंगे या शेतकऱ्याने पाच एकर टोमॅटो व अडीच एकर झेंडू पिकांची लागवड केली. मोठ्या प्रमाणात खर्च या पिकावर करण्यात आला होता. त्यातून पिके चांगली बहारात आली होती.

उत्पादन खर्च, मजुरी खर्च त्यानंतर टोमॅटो विक्रीला बाजारात नेण्यासाठी येणारा वाहतूक खर्चही सुटत नाही. त्यामुळे आज उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ आली.
-जयराम धोंडीबा ढेरंगे, शेतकरी, खंडेरायवाडी, ता. संगमनेर.

गेल्या वर्षी 20 किलोच्या क्रेटला 400 रुपये भाव मिळला होता. यंदा मात्र हा दर 50 रुपयांवर आला आहे. यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादनात भरमसाट वाढ झाल्याने गणपतीत पण फुलांच्या दारात वाढ झाली नाही. सात रुपये किलो भावाने फुले विकावी लागत आहेत. उत्पादन खर्च तर दूरच, तोडणी व वाहतुकीचा खर्च भागात नसल्याने बेहाल झालेल्या ढेरंगे यांनी आज पाच एकर टोमॅटो व अडीच एकर झेंडूच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)