लोखंडी कठडे तोडून कार कोसळली 500 फूट दरीत 

माहुली (ता. संगमनेर) : येथील एकल घाटातील दरीत कोसळून चक्‍काचूर झालेली कार. 

एकाचा मृत्यू, दोघे जखमी : पुणे-नाशिक महामार्गावरील एकल घाटातील घटना

संगमनेर  – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली गावाजवळ एकल घाटात रविवारी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. भरधाव मारुती इकोव्हॅन (कार) घाटात असलेले लोखंडी कठडे तोडून 500 फुट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

एकल घाटातील उतारावर ही घटना घडली. शिर्डीकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारी (एमएच 14 एफसी 1487) मारुती इकोव्हॅन घाटात असलेले लोखंडी कठडे तोडून 500 फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात संजय मधुकर साळवे ( वय-43, रा.रमाबाई नगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्या डोक्‍याला गंभीर स्वरूपाची इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या इकोव्हॅनमधील सयाजी बापू वाळूंज (45, भोसरी पुणे), सचिन बाळू मोटे (26 नेहरूनगर, पिंपरी चिंचवड, पुणे) दोघे जखमी झाले. जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घारगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची खबर मिळताच पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, नामदेव बिरे, आदिनाथ गांधले आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दरीतून जखमींना बाहेर काढण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)