बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी “सांड की आँख” सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यामध्ये तापसी आणि भूमीचा एक वेगळ्याच लुक दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या वृद्ध शार्पशूटर ‘चंद्रो तोमर’ आणि ‘नणंद प्रकाशी तोमर’ यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे.
#SaandKiAankhTeaser#SaandKiAankh#ThisDiwali pic.twitter.com/5cc1jEx5nZ
— taapsee pannu (@taapsee) July 11, 2019
चंद्रो तोमर या 87 वर्षांच्या आहेत तर नणंद प्रकाशी तोमर या 82 वर्षांच्या असून सर्वत्र त्यांना ‘रिव्हॉल्वर दादीं’ म्हणून ओळखलं जातं. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं आहे.