जानवेधारी राहुल गांधींचं गोत्र कोणतं? भाजपाचा प्रश्न

इंदोर: भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज ‘राहुल गांधींचे गोत्र कोणते?’ असा प्रश्न उपस्थित करत एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुल गांधी यांनी गुजरात येथील सोमनाथ मंदिराला भेट दिली होती. राहुल गांधींच्या मंदिर भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी, ‘राहुल गांधी हे जानवे-धारी ब्राम्हण आहेत’ असे म्हंटले होते.

सुरजेवाला यांच्या या वक्तव्यास प्रतिप्रश्न करत संबित पात्रा यांनी मध्यप्रदेश येथील इंदोर शहरात बोलताना, ‘जर राहुल गांधी हे जानवे-धारी ब्राम्हण आहेत तर त्यांचे गोत्र कोणते?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपा तर्फे काँग्रेस राहुल गांधींना जानवे-धारी ब्राम्हण दर्शवून हिंदूंची मतं लाटण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यप्रदेश येथे येत्या २८ नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे राज्यात जोरदार प्रचार सुरु असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)