संदीप दीक्षित यांचा भाजपमध्ये प्रवेश

सातारा – नागझरी, ता. कोरेगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सातारा जिल्हा सरचिटणीस संदीप दीक्षित यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संदीप दीक्षित यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले.

भाजपची धोरणे ग्रामीण भागात पोहोचत असून कराड उत्तर मतदार संघातील ग्रामीण भागात संदीप दीक्षित यांच्यामुळे भाजप पक्ष भक्कम होईल. संदीप दीक्षित यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी कराड उत्तर मतदारसंघाचे भाजपा युवा नेते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे, विकास गायकवाड उत्कर्ष माने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)