अवैध वाळू उत्खननप्रकरणी संयुक्त कारवाई

File photo

श्रीगोंदे- भीमा नदीपात्रात आज श्रीगोंदे तहसीलदार आणि दौंड महसूल पथकाने संयुक्त कारवाई करत 28 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. भीमा नदीपात्रात आर्वी, अनगरे, पेडगाव, आलेगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती श्रीगोंदे तहसीलदार महेंद्र माळी यांना मिळाली होती. त्याप्रमाणे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदे तहसील आणि दौंड महसूल यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत, अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 5 फायबर आणि 2 सक्‍शन बोटी नष्ट केल्या. या कारवाईत एकूण 28 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

कारवाईत मंडल अधिकारी विलास आजबे, संजय पोटे, नितीन यादव, लिपिक सतीश घोडेकर, केदारनाथ सरोदे, दौंड महसूल विभागाचे माणिक बारावकर, दादासाहेब लोणकर, पोलीस कर्मचारी प्रताप देवकाते, भारत गायकवाड यांनी सहभाग घेतला. भीमा नदीपात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी सलग दुसरी कारवाई झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

यावेळी तहसीलदार माळी म्हणाले, अवैध वाळू उत्खननसंबधी महसूल विभाग कारवाईबाबत नेहमीच आग्रही असते. वाळू उपसा रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या कारवाईत जो मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ज्या बोटी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या बोटींच्या मालकांची नावे शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरु असून ती मिळाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)