‘या’ कारणामुळे आयसीसीने सनथ जयसूर्याचं केलं दोन वर्षासाठी निलंबन

file photo

दुबई – श्रीलंकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचे आयसीसीने दोन वर्षासाठी निलंबन केलं आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आचार संहिता भंग केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आयसीसीच्या 2.4.6 आणि 2.4.7  च्या कलमानुसार जयसूर्यावर ही कारवाई झाली आहे.

जयसूर्या 2011 मध्ये निवृत्त झाला असून तो सध्या क्रिकेट खेळत नाही, पण तरी त्याच्यावर आयसीसीनं ही कारवाई केली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचा भंग केल्याचं सनथ जयसूर्यानंही मान्य केलं आहे. या कारवाईमुळे सनथ जयसूर्या पुढची दोन वर्ष आयसीसीशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही संस्थांमध्ये कोणतंही पद भुषवू शकणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, 48 वर्षीय जयसूर्या 2011 मध्ये निवृत्त झाला. तो श्रीलंकेच्या संघाचा आधारस्तंभ मानला जायचा. भलाभल्या गोलंदाजांना त्यानं आपल्या फलंदाजीनं नामोहरम केलं होतं. 22 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जयसूर्यानं 110 टेस्ट आणि 445 वनडे खेळल्या. जयसूर्या श्रीलंकेचा माजी खासदारही आहे. सनथ जयसूर्या हा श्रीलंकेच्या निवड समितीचा माजी अध्यक्षही होता.

काय आहे  2.4.6 आणि 2.4.7 कलम….

कलम 2.4.6 – यामध्ये मध्ये आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीला मदत न करणे, तसेच पथकानं मागितलेली माहिती आणि कागदपत्र न देणे यांचा समावेश होतो.

कलम 2.4.7 – यामध्ये भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीत अडथळे निर्माण करणं, तसंच माहिती लपवणं, तपासासाठी महत्त्वाची असणारी कागदपत्र गहाळ करणं याचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)