काँग्रेस उमेदवारसह अशोक चव्हाण याचा सनातनशी संबंध : प्रकाश आंबेडकर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. प्रचारावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर य़ांनी काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारादरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपकडून अनेक आरोप होत असताना त्यावर राहुल गांधींनी मौन बाळगल्याने त्यांच्याबाबत संशय बळावला आहे. यामुळेच आम्ही काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)