समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरण : असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली – समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे. बारा वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष एनआयए ( NIA ) कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी हरियाणा पोलिसांनी केली आणि नंतर या हे प्रकरण एनआयए ( National Investigation Agency) कडे सोपवण्यात आलं होतं. आज स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्देोष मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या आठवड्यातून दोन दिवस चालणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 ला बॉम्ब ब्लास्ट झाला होता. ही ट्रेन दिल्लीहून लाहोरला चालली होती. हरियाणाच्या पानीपत येथे हा धमाका झाला. यात 68 लोकांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. यात जीव गमावणारे अधिक नागरिक हे पाकिस्तानातील होते. मृत 68 जणांमध्ये 16 मुले तसेच चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)