लोकसभा2019 : समाजवादी पक्षाकडून आणखी एक यादी जाहीर

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची (बसप) आघाडी झालेली आहे. भाजपला लढत देण्यासाठी या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आझमगड या लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असून, पक्षाचे नेते आझम खान हेही उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. समाजवादी पक्षाने आज आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये एटा लोकसभा मतदार संघातून देवेंद्र यादव, पीलीभीत लोकसभा मतदार संघातून हेमराज वर्मा आणि फैजाबाद लोकसभा मतदार संघातून आनंद सेन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1110527705571885056

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)