‘पुरी’तून तीन वेळा लोकसभा जिंकलेल्या पिनाकी मिश्रांना संबित पात्रांचे आव्हान

पुरी : आपल्या आक्रमक वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या संबित पात्रा यांना भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशातील पुरी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुरी येथून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या संबित पात्रा यांना पुरीच्या जनतेने तीनवेळा संसदेत पाठविलेल्या पिनाकी मिश्रा यांच्यासोबत सामना करावा लागणार आहे. सध्या बिजू जनता दलामध्ये असणारे पिनाकी मिश्रा हे पुरी मतदारसंघातून १९९६मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. यानंतर २००९ व २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मिश्रांनी बिजू जनता दलातर्फे निवडणूक लढवत सलग दोनदा जनतेचा कौल मिळवला आहे.

संबित पात्रा यांना भाजपने विद्यमान खासदार पिनाकी मिश्रांच्या विरोधात उतरवले असले तरी भाजपला या मतदारसंघामधून आजतागायत एकदाही विजय मिळवता आलेला नाहीये. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरामध्ये मोदी लाटेच्या माध्यमातून भाजपला मोठे जनमत मिळाल्याचे दिसले असले तरी मात्र पुरी मतदारसंघामध्ये मोदी लाटेचा विशेष प्रभाव पाहायला मिळाला नाही. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अशोक साहू हे तिसऱ्या स्थानावर राहिले तर काँग्रेसच्या सुचरिता मोहंती यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील बिजू जनता दलातर्फे पिनाकी मिश्रांनाच संधी देण्यात येणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट असून आता संबित पात्रा ‘पुरी’तून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या पिनाकी मिश्रांना टक्कर देण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1109449905037287424

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)