संभाजी भिडेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

पुणे – ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे यांची तब्येत अचानक बिघडली असून संभाजी भिडे यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब कमी झाल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सांयकाळच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्‍याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. संभाजी भिडे हे पुण्‍याहून रायगडकडे येत असताना अचानक त्यांना त्रास सुरू झाला. त्यानंतर भिडेंना तात्काळ रुग्णालयात भर्ती करण्यात आलं.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)