‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी 

अभिनेता रणवीर सिंह सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत होत असलेल्या लग्नामुळे चर्चेत आहेत. याशिवाय त्याचा आगामी “सिम्बा’ चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात “गोलमाल’मधील टीमनेही एक गाणे शूट केले असून या गाण्यातूनच “गोलमाल 5’ची घोषणा करण्यात येणार आहे.

ही माहिती अरशद वारसीने “भैयाजी सुपरहिट’च्या प्रमोशल मुलाखतीवेळी दिली. तो म्हणाला, रोहिट शेट्टी सध्या “सिम्बा’ चित्रपटात व्यस्त आहे. त्यामुळे “गोलमाल 5’च्या डेटस्‌ आणि कथानकाबाबत निश्‍चित सांगता येत नाही. आम्ही काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे “सिम्बा’चे एक गाणे शूट केले आहे. या गाण्यात आम्ही गोलमालवाला सिग्नेचर स्टाईल दाखवित

-Ads-

“गोलमाल 5’ची घोषणा करणार आहोत. शूटिंगवेळी मी रोहितला विचारले की, गाण्यात आम्ही गोलमाल घेवून येत असल्याचे सांगू का, तर त्याने होकार दर्शविला. दरम्यान, “भैयाजी सुपरहिट’मध्ये अरशदशिवाय सनी दओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
12 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)