शोलेतील ‘सांबा’च्या मुलींचे लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण 

मुंबई – 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या चिपत्रपतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात अजून सुद्धा जिवंत आहे. त्यातील अशीच एक लक्षात राहणारी व्यक्तिरेखा म्हणजे गब्बर सिंगच्या टोळीतील ‘सांबा’.

अभिनेते मोहन माकीजानी उर्फ मॅक मोहन यांनी ही भूमिका साकारली होती. मात्र आता, मॅक मोहन यांच्या मुली बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.मॅक मोहन यांच्या ‘मंजरी’आणि ‘विनती’ या दोन मुली स्केटबोर्डिंगवर आधारित बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘डेजर्ट डॉल्फीन’असं या चित्रपटाचं नाव आहे. मंजरी लेखिकी-दिग्दर्शिका आहे तर विनती सहलेखिका आणि निर्माती आहे. मंजरी आणि विनती त्यांच्या या चित्रपटातून महिला सशक्तीकरणाचा संदेश देणार आहेत. चित्रपटातून राजस्थानमधल्या एका ग्रामीण भागातील १६ वर्षीय प्रेरणा आणि लॉस एंजिलिसमधल्या ३४ वर्षीय जेसिकाची कथा दाखवण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)