विराट असामान्य खेळाडू – सॅम करन

सिडनी – विराट हा असामान्य खेळाडू असून जेव्हा भारत आणि इंग्लंडमध्ये सामना होईल तेव्हा मी त्याला बाद करण्याची आशा करतो, असे विधान इंग्लंडचा जलदगती गोलंदाज सॅम करनने केले आहे. 2020 मध्ये होणाऱ्या टी – 20 विश्‍वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाल्यावर सिडनी येथे एक कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्याने हे विधान केले आहे.

2020 मध्ये होणाऱ्या टी -20 विश्‍वचषकाचे वेळापत्रकही जाहीर झाले असून पुरुषांच्या ब गटात भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतील दोन संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंडचा सामना गट साखळीच होईल. विराट कोहलीला कसे बाद करशील या प्रश्‍नाचे उत्तर देताना सॅम करन मिश्‍कीलपणे म्हणाला, तो बाद झालेला चेंडू नो बॉल नसावा. तो एक असामान्य खेळाडू आहे. जेव्हा आमचे संघ आमनेसामने येतील त्यावेळी त्याला लवकर कसे बाद करायचे याचा विचार करता येईल, असेही तो म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टी-20 विश्‍वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना 1 नोव्हेंबर 2020 ला मेलबर्नच्या मैदानावर होणार आहे. महिला टी- 20 विश्‍वचषक पार पडल्यानंतर काही महिन्यांनंतर पुरुषांची स्पर्धा होणार आहे. विश्‍वचषकातील आयोजित लढतीबाबत सॅम करन म्हणाला, सर्व लढती अप्रतिम होतील. कारण दोन्ही गटात बलाढ्य संघ आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये विश्‍वचषक खेळण्याची मजाच काही वेगळी असते. कारण, येथील प्रेक्षक उत्स्फूर्तपणे मैदानांवर गर्दी करतात आणि पाठिंबा देतात. मी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्‍वचषकात काही सामने खेळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)