‘पानशेत पुरा’च्या अंधारातून उजेड शोधणाऱ्या पूरग्रस्तांना सलामच !

– संदीप कापडे
‘पानशेत धरण’ फुटल्यामुळे अंगावरील वस्त्रानिशी आणि मेहनतीने केलेली सगळी कमाई महापुराच्या स्वाधीन करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या मदतीसाठी तेव्हा देशभरातून प्रयत्न झाले. त्या पूरग्रस्तांच्या करून कहाण्या ऐकून आजही डोळ्यातून अश्रुधारा मोकळ्या होतात. या घटनेतून सावरून ताकदीनिशी उभ्या झालेल्या पूरग्रस्तांना सलामच !
‘पानशेत पूर’ हा शब्द जरी एकला तरी अंगावर शहारे येतात. भीती दाटून येते. तो काळा दिवस होता १२ जुलै, १९६१ आजही हा दिवस पुण्यातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या मनावर कोरला आहे. याच दिवशी पानशेत धरण फुटलं होत आणि पुणे शहर जलमय झालं होतं. त्यामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली. लोकांचा संसार उघड्यावर आला. त्यानंतर जणू प्रत्येक जण म्हणत होतं. ‘कोणी घर देतं कारे ! घर !
प्रशासनाची अतिघाई नडली आणि दुर्घटना घडली. असे म्हणायला हरकत नाही. १२ जुलै १९६१ या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली होती. भिडे पुलाजवळील केळकर रोडवरून जात असतांना आजही पानशेत पूररेषा नजरेस पडते.
पानशेत पुरामुळे ७५० घरे उद्ध्वस्त झाली. तब्बल २६ हजार कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली. दहा हजार कुटुंबे बेघर झाली. सोळा हजार दुकानांतील वस्तूंचे साठे नष्ट झाले. या घटनेला आज ५७ वर्ष पूर्ण झाले. तरी देखील ही घटना आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे.
प्रशासनाने अंबा नदीवर ‘पानशेत’ येथे मातीचे धरण बांधायचे ठरवले. १० ऑक्टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९६२ पर्यंत धरण बांधून पूर्ण होणार होते. मात्र १९५९-१९६०च्या सुमारास धरणाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्रशासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला. आणि हाच निर्णय धोकादायक ठरला. कारण त्यानंतर धरणाचे कामे धीम्यागतीने होऊ लागले. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे जूनअखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे धरणात भरपूर पाणी जमा झाले आणि धरणं फुटले. सोबत अनेकांचे जीवन उध्वस्त करून गेले.

यामध्ये प्रशासनाचा आळशीपणा, कामात दिरंगाई चांगली अंगलट आली. असे पुणे शहरामधील गोखले अर्थशास्त्र संस्थेने १९६७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालातसुद्धा लिहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)