मानवतेप्रती शिखांचे शौर्य, कटिबद्धता आणि सहभागाला सलाम : उपराष्ट्रपती

 “भारतातील अग्रेसर शीख’ पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली – पूर्वग्रहदूषित, असहिष्णुता आणि संशयाच्या वादळी कालखंडात शिखांनी मानवतेप्रती दर्शवलेल्या शौर्य आणि कटिबद्धतेला आपण सलाम करत असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत डॉ. प्रभलीनसिंग लिखित आणि पंजाब विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या “भारतातील अग्रेसर शीख’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पुस्तकात समाजाच्या विविध स्तरातील 50 महान शीख व्यक्तीमत्वांचा यशस्वी प्रवास अधोरेखित करण्यात आला असून हे पुस्तक म्हणजे शीख धर्माचे संस्थापक श्रीगुरु नानक देवजी यांना साजेसे अभिवादन आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले.
जात, धर्म आणि संप्रदाय यांचे बंधन न बाळगता गरीबातल्या गरीबांची सेवा करण्याप्रती असलेली कटिबद्धता म्हणजे गुरु नानक देवजी यांचे या महान देशाप्रती असलेले महत्वपूर्ण योगदान आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले. लोकसेवा आणि राष्ट्र उभारणीत सहकार्य अशा कर्तव्यनिष्ठ समाजाच्या उभारणीचा पाया गुरु नानक यांनी रचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जेंव्हा-जेंव्हा गरज निर्माण झाली तेंव्हा-तेंव्हा शिखांनी देशाचे संरक्षण केल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)