आहारातील मिठाचे प्रमाण (भाग 1)

आहाराचा उपचार करताना तीन बाजूंनी विचार करावा लागतो
1) आहाराचे स्वरूप म्हणजे घनता,
2) आहारातून काय वगळायचे आणि
3) आहारात कशाची पुष्टी असावी. ज्या ज्या रुग्णांची जशी गरज असेल;
त्याप्रमाणे त्या रुग्णाने कोणकोणते आहारातील घटक कमी सेवन करावेत अथवा वगळावेत हे ठरते.

मीठ हा घटक जास्त प्रमाणात वगळण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मीठ म्हणजे सोडियम क्‍लोराइड. यातला सोडियम हा क्षार कमी सेवन केला जावा, या हेतूने मिठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. ज्याचा रक्‍तदाब वाढलेला आहे किंवा ज्यांच्या शरीरात सोडियम क्षार आणि पाणी साचलेले आहे; अशा सर्व रुग्णांना आहारातील मिठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

यकृताच्या आजारात रक्तातील प्रथिने विशेषत: आम्बुलिन कमी होऊ लागते. पर्यायाने पोटात पाणी आणि पावलांवर सूज येऊ लागते. अशी पायावर सूज हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन व्यवस्थित न झाल्यानेदेखील येते. मूत्रपिंडाचे काम नीट न झाल्याने शरीरातील सोडियम क्षार व पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तरीदेखील अशी परिस्थिती उद्‌भवते.

-Ads-

सोडियम क्षार मूत्रावाटे बाहेर टाकला जावा, या हेतूने मूत्रवर्धक औषधेदेखील वापरली जातात. अशी औषधे वापरली किंवा वापरली नाहीत, तरीदेखील आहारातील मिठाचे सेवन कमी करणेच इष्ट असते. मिठाचे सेवन मर्यादित ठेवल्यामुळे मूत्रवर्धक औषधांची मात्रा कमी प्रमाणात वापरावी लागते. अर्थातच या औषधांचे नको असणारे परिणाम त्यामुळे कमी होतात. या नको असणाऱ्या परिणामांतील एक नेहमी आढळणारा परिणाम म्हणजे पोटॅशियम क्षार कमी होणे.

पोटॅशियम क्षार मर्यादेपेक्षा कमी झाल्यास पेटके येतात, स्नायू थकतात, आतड्याची हालचाल मंदावते. फारच कमी झाल्यास हृदयाच्या स्पंदनाची क्रिया बिघडून जिवाला धोका निर्माण होणे संभवते. खाण्यात मीठ जेवढे कमी तेवढा हा पोटॅशियम कमी होण्याचा धोकाही कमी होतो. लहान आतड्यातून सोडियमचे रेणू शोषले जाताना ग्लूकोज व काही अमायनो ऍसिडच्या रेणूंचे महत्त्वही खूप असते.

आपल्या आहारातील विविध अन्नघटकांत सोडियमचे प्रमाण कमी जास्त असते. एखादा अन्नघटक आपण किती प्रमाणात घेतो आणि किती वेळा घेतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पालकाच्या भाजीत दुधापेक्षा सोडियम दुपटीने असते. तथापि क धीतरी 60 ते 100 ग्रॅम पालक घेण्याने मिळणाऱ्या सोडियमपेक्षा रोज 500 मिलीलीटर दूध घेणाऱ्या व्यक्तीला कितीतरी जास्त सोडियम मिळेल. पदार्थ टिकविण्यासाठी ते खारवले जातात.

डबाबंद केलेल्या अन्नातदेखील पदार्थ टिकविण्यासाठी वापलेली सोडियमचा अणू असणारी रसायने मुबलक असतात. शीतपेये, तोंडीलावणी, बेकरीतून मिळणारे पदार्थ (ब्रेड, बिस्कि टे इ.) बाजारात मिळणारे बटर (लोणी) यात सोडियमची रेलचेल असते.

चायनीज रेस्तरॉंमध्ये पदार्थ शिजवताना मोनो सोडियम ग्लूटामेट (अजिनोमोटो) वापरले जाते. पापड, खारे दाणे, शेव, गाठी, भजी, चिवडा हे तर तिखट मिठाचेच पदार्थ आहेत. ज्यांना सोडियम टाळावयाचे आहे अशा व्यक्तींनी या असल्या पदार्थांपासून दूरच राहणेच इष्ट आहे.

आहारातील मिठाचे प्रमाण (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)