‘भारत’मधील वयोवृद्ध सलमानचा अनोखा लूक रिलीज 

मोस्ट अवेटेड ‘भारत’  चित्रपटातील सलमान खानचा एक वेगळाच लूक समोर आला आहे.  यामध्ये सलमान वयोवृद्ध अवस्थेत दिसत आहे. तसेच त्यावर वर्ष २०१० असे लिहिले आहे. हे नवे पोस्टर सलमानने ट्विटरवर शेअर केले आहे. यावेळी

सलमानने लिहले कि, ‘जेवढे पांढरे केस माझ्या दाढी आणि डोक्यावर दिसत आहेत. त्याहून कित्येक पटीने माझे आयुष्य रंगीत आहे’. पोस्टरमध्ये खालच्या भागात अनेक लोक आणि लहान मुले परेशान दिसत आहेत.  या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांना तरुणपणापासून वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)