कॉमेडी किंगला सलमानची दिवाळी भेट 

कॉमेडी किंग कपिल शर्मा टिव्हीवर पुन्हा जोरदार वापसी करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्मा डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर छोटया पडद्यावर कॉमेडीचा तडका देणार आहे. विशेष म्हणजे, कॉमेडी किंगचे पुन्हा पर्दापण करण्यात सलमान खानचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

कपिलच्या “कॉमेडी शो’ला खुद्‌द सलमान खानचे प्रोडक्‍शन हाउस प्रोड्यूस करणार आहे. याचे शुटिंग पुढील महिन्यात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, हा कार्यक्रम कपिलच प्रोड्यूस करणार होता. परंतु “फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’च्या प्रोडक्‍शनची जबाबदारी चॅनलने इतर कोणाला तरी दिली होती. कपिलच्या या शोसाठी फिल्म सिटीच्या आठव्या मजल्यावर सेटही उभारण्यात येत आहे. याच ठिकाणी कपिलच्या काही शोचे चित्रिकरण करण्यात आले होते.

कपिल शर्मा 12 डिसेंबर रोजी जालंधर येथे त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी रिसेप्शन पार्टी होणार आहे. दरम्यान, कॉमेडियन कपिल शर्मा दिर्घ काळापासून टेलिव्हिजनपासून दूर आहे. अनेक वादविवाद निर्माण झाल्याने तो लाईमलाईटपासून दूर होता. त्यामुळे त्याच्या पुनरगमनाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)