सलमान रश्दी यांची कादंबरी ‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’येणार नेटफ्लिक्सवर …

सलमान रश्दी यांची कादंबरी ‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’ ही नेटफ्लिक्सच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहे. सलमान रश्दी यांनी  १९८१ चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट मध्ये ही कादंबरी लिहली होती.  या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळले आहेत. त्यात १९८१ बुकर पुरस्कारचा समावेश आहे. तर बेस्ट ऑफ बुकर पुरस्कार दोन वेळेस १९९३ आणि २००८ मध्ये मिळाला आहे. त्याचबरोबर मनाचा जेम्स टेट मेमोरीयल पुरस्कार देखल याकादंबरीला मिळाला आहे.

‘चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट’ ची मूळकथा ही सलीम सिनाई याच्याभोवती फिरते. भारताच्या स्वातंत्र्याच्या रात्री म्हणजे १५ ऑगस्ट १९४७च्यावेळी जन्म झालेल्या आणि काही चमत्कारिक शक्ती मिळलेल्या सलीम भोवती मूळ कथा फिरते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत देशाच्या प्रत्येक घटनेमुळे त्याच्यावर देखील परिणाम होत असतो. भारत देशाशी त्याची जणू नाळच जोडलेली असते. सलीममधील सर्वात चमत्कारिक शक्ती म्हणजे, स्वातंत्र्याच्या पहिल्या काही तासात जन्मलेल्या अन्य १००० व्यक्तींशी टेलिपॅथीक शक्तीने जोडले गेले असणे.

नेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष एरीक बारमर म्हणाले,” चिल्ड्रेन्स ऑफ मिडनाईट ही कादंबरी जगातील सर्वश्रेष्ठ कादंबर्यांपैकी एक आहे. सध्याच्या आधुनिक भारतासाठी मिळवून घेत यावर काम चालू आहे. जेणेकरून हे आधुनिक भारताला आणि जगाला नव्याने दिसेल.”

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)