“भारत’च्या शूटिंगसाठी सलमान पंजाबला रवाना 

बॉलिवूडचा “सुलतान’ सलमान खान याचा आगामी “भारत’ चित्रपटाचे शूटिंग लवकरच पूर्ण होणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण अंतिम टप्पात असून यासाठी सलमान खान पंजाबला रवाना झाला आहे. आपल्या फायनल शेड्यूलसाठी पंजाबला जात असताना सलमान खान आज विमानतळावर दिसला. यावेळी त्याने पर्पल टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती.

अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शित “भारत’ चित्रपट हा “ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रीमेक आहे.
या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांना तरुणपणापासून वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे. सलमान-कतरीना यांच्याशिवाय “भारत’मध्ये तब्बू, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर आदी कलाकार झळकणार आहेत.

-Ads-

दरम्यान, या चित्रपटात सलमान खान सोबत प्रियांका चोप्रा मुख्य नायिकेची भूमिका साकारणार होती. मात्र, चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच प्रियांकाने चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला. चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत सांगायचे म्हटल्यास, सलमान खानचे बहुतेक चित्रपटांप्रमाण हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)