सलमानचा ‘व्हॅलेंटाईन डे’ कतरिनाबरोबर

“व्हॅलेंटाईन डे’ असलेल्या संपूर्ण आठवड्याभरात सर्वत्र प्रेमाचेच वातावरण भारलेले असते. मग ते सध्याचे असो, वा पूर्वीचे प्रेम व्यक्‍त करण्यासाठी “व्हॅलेंटाईन’सारखा चांगला मुहुर्त नाही. या दिवशी आपल्या जुन्या प्रेमाला पुन्हा अनुभवण्याची संधी सलमाननेही सोडलेली नाही. सलमानने यंदाचा व्हॅलेंटाईन डे कतरिना कैफ बरोबर सेलिब्रेट करायचे ठरवले आहे. या दोघांनी मिळून “व्हॅलेंटाईन’ला दिवसभर काम करायचे ठरवले आहे. सलमानच्या “भारत’मध्ये कतरिना पण आहे. त्यामुळे यंदाच्या “व्हॅलेंटाईन’ला दोघेही दिवसभर शुटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत.

“भारत’च्या सेटवर सलमान आणि कतरिनासोबतच जॅकी श्रॉफ, तब्बू आणि सुनिल ग्रोवर हे तिघेही एकत्र येणार आहेत. अत्यंत नाट्यमयरितीने हे सगळेजण एकत्र येण्याच्या सीनचे शुटिंग या दिवशी होणार आहे. याशिवाय सलमान आणि कतरिनाने “भारत’मध्ये लग्नसमारंभानिमित्तचे एक गाणे नुकतेच शूट केले आहे. या सगळ्याचा एकत्र आनंद घेऊन सलू आणि कॅटने व्हॅलेंटाईन साजरा करायचे ठरवले आहे.

कतरिनाच्या बरोबरच्या प्रियांका, दीपिका, अनुष्का या सगळ्या जणींची आता लग्न झाली आहेत. पण कतरिनाला मात्र कोणी जोडीदार मिळत नाही आहे. या सगळ्या मैत्रिणींनी लग्न झाल्यावर आपल्याला विसरू नये, अशी विनंतीच कॅटने केली आहे. आता कदाचित तिला एकटेपणा जाणवायला लागला असेल. कतरिनाचे पूर्वी सलमान आणि रणबीर कपूरबरोबर रिलेशन होते. मात्र काळाच्या ओघात सगळी समिकरणे मागे पडली आहेत.

“भारत’हा हिंदी बरोबर तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये देखील बनणार आहे. त्यासाठी या तिन्ही भाषांमधील डबिंग आर्टिस्टची निवड करण्याचे काम सध्या चालले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)