सलमान ‘या’ चित्रपटातून भाची ‘एलिजा अग्निहोत्री’ला करणार लाॅन्च  

सलमान खान याला चित्रपट इंडस्ट्रीमध्ये गाॅड फादर मानले जाते. सलमान खान बॉलिवूडमध्ये नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. अनेक स्टार किड्सला बॉलिवूड इंडस्ट्रीत दबंग सलमान खानने लाॅन्च  केलं आहे. एवढंच काय तर आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील सलमान खानने लाॅन्च केलं आहे. सलमान खान कायमच नव्या टँलेटला बॉलिवूडमध्ये प्लॅटफॉर्म मिळवून देत असतो.

सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर,कतरीना कैफ, डेजी शाह अशा अनेक अभिनेता-अभिनेत्रींची नावे या यादीत आहेत. दरम्यान, सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माला लाव्हरात्री या चित्रपटाद्वारे लॉन्च केलं होतं. आता सलमान आपली भाची  एलिजा अग्निहोत्री हिला लाॅन्च करणार आहे. माहितीनुसार सलमान हा आगामी ‘दबंग 3’ या सिनेमातून एलिजा हिला लाॅन्च करणार आहे.

एलिजा ही सध्या प्रसिध्द कोरियोग्राफर सरोज खान यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. ‘दबंग 3’ मध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा हे मुख्य भूमिकेत असणार आहेत,तर एलिजा ही सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)