‘या’ कारणासाठी सलमानला वडिलांनी झापले

सलमान खानला त्याच्या कृत्यांमुळे अनेकदा अडचणीत यायला लागले आहे. त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्याशी संबंधित वादविवादांचीच अधिक चर्चा होत असते. पण तरीही सलमान विविध उद्योग करतच असतो. त्याच्या वडिलांनी म्हणजे सलीम खान यांनी मात्र आता सलमानचे कान पकडायचे ठरवले आहे. त्यांनी सलमानला चक्कम ताकीद दिली आहे की मुलींना घेऊन बाहेर हिंडत जाऊ नकोस. स्वतः सलमान खाननेच “दस का दम’च्या सेटवर ही हकिगत सांगितली आहे.

“सार्वजनिक ठिकाणी रोमान्स केल्याबद्दल भारतात किती टक्के लोकांवर पोलीस कारवाई करत असतील ?’ असा प्रश्न सलमानने एका एका सेलिब्रिटी गेस्टला विचारला. पण गेस्टनी या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदरच सलमानने आपले मत सांगितले. प्रेमीयुगुलांना सार्वजनिक ठिकाणी हिंडताना बघितले की खूप वाईट वाटते. कारण एका छोट्या घरामध्ये 8-10 लोक राहात असतात. सामाजिकदृष्ट्या वाईट दिसते म्हणून हे प्रेमीयुगुल हॉटेलांमध्ये जाऊ शकत नाही. मग भेटणार तरी कोठे आणि कधी? अशा युगुलांची काय अवस्था होत असेल कोणास ठाऊक, असे सलमान म्हणाला.

-Ads-

स्वतःचा अनुभव सांगताना तो म्हणाला की, एखाद्या गर्लफ्रेंडला भेटायचे असेल, तर वडील सलीम खान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर गर्लफ्रेंडला भेटायचे असेल, तर शहरात कोठेही फिरायला जाऊ नकोस. त्यापेक्षा त्या मुलीला घरीच घेऊन येत जा. अशी सूचना एखाद्या पित्याने मुलाला केल्याचे आपल्या तरी ऐकिवात नाही. एवढेच नाही, तर सलीम खान यांनी जो नियम सलमानसाठी केला आहे, तोच आपल्या मुलींसाठीही केला आहे. जर एखादा चांगला मुलगा आवडला तर तिने सर्वप्रथम आपल्या मातापित्यांना याबाबत सांगावे. काहीही लपवून ठेवता कामा नये, असा दंडक सलीम खान यांनी आपल्या मुलींना घालून दिला होता. आपल्या मुलींना आपला जोडीदार निवडण्याचे अधिकारही सलीम खान यांनी दिले होते, हे देखील सलमानने आवर्जून सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)