सलमान खान निर्मित ‘लव्हरात्री’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सलमान खानची निर्मिती असलेला ‘लव्हरात्री’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या मेहुण्याला लॉन्च करत आहे. तसेच अभिनेत्री वरीना हुसैनचा हा पहिलाच चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये डान्स, रोमान्स आणि अॅक्शन दाखवले आहे.

युट्युबवर ‘लव्हरात्री’चा ट्रेलर धुमाकूळ घालत असून आतापर्यंत हा ट्रेलर २ लाखापेखा जास्त लोकांनी पाहीला आहे. या चित्रपटात आयुष शर्मा गरबा शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर वरीना विदेशातून नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी आलेली आयुष शर्माच्या प्रेमिकेच्या भूमिकेत आहे.

-Ads-

आयुष शर्मा आणि वरीना हुसैन यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात राम कपूर, रोनित रॉय, सोहेल खान आणि अरबाज खान देखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले असून त्यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे. या दिवाळीत ‘लव्हरात्री’ प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)