कन्हैय्या कुमारच्या जीवनावरच्या वेबसिरीजमध्ये सलमान खान

बॉलिवूडच्या स्टारकडून डिजीटल प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ एक पदार्पण व्हायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार वेबसिरीजमध्ये येणार असल्याचे ऐकिवात होते. मात्र त्याच्य आगोदर सलमान खानने वेबसिरीजमध्ये पदार्पण करण्यात यश मिळवले आहे. या वेबसिरीजचे नाव “तांडव’ असे असेल आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारच्या जीवनावर ही सिरीज आधारलेली असेल.

सलमानने या वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी प्राथमिक मंजूरी दिली आहे. या वेबसिरीजसाठी त्याला स्वतःचे वजन कमी करावे लागणार आहे. तसेच बिहारी-भोजपुरी उच्चारांवरही त्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. जयप्रकाश नारायण यांच्या नंतर प्रथमच विद्यार्थी राजकारणाचे वारे वाहिल्याने या वेबसिरीजचा विषयही त्याला आवडला आहे.

यामध्ये कन्हैय्या कुमार “जेएनयु’मधील विद्यार्थी संघटनेचा नेता बनण्यापासून लोकसभेचा उमेदवार बनण्यापर्यंतचा कालखंड दाखवण्यात आलेला असेल. कन्हैय्या कुमारने 2016 मध्ये “जेएनयु’मध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्यापासून या सिरीजची सुरुवात होईल. लोकसभेच्या निवडणूकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून बेगुसराय या मतदारसंघातून कन्हैय्या कुमार निवडणूक लढवतो आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)