सलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट

सलमान खान हा “मम्माज बॉय’ आहे, असे म्हटले जाते. मात्र फारच थोड्या “चॅट शो’मध्ये सलमान आपल्या आईबाबत मोकळेपणाने बोलताना बघायला मिळाले आहे. अलिकडेच सलमानच्या आई सलमा खान यांना दैनंदिन कामकाजासाठी एक कारची आवश्‍यकता भासली होती. त्यांनी स्वतःसाठी एक साधी कार खरेदी करण्याचे ठरवले होते. मात्र जेंव्हा सलमानला या प्लॅनबाबत समजले, तेंव्हा त्याने आपल्या आईला एक लक्‍झरी कार विकत घेऊन दिली. ही कार “एसयुव्ही’मधील सर्वात अलिकडील आणि सर्वात सुसज्ज अशी आहे.

आपल्यासाठी नवीन कार खरेदी केल्याचे सलमा खान यांना माहितीच नव्हते. पार्किंगमध्ये नवी कोरी कार पार्क केलेले बघून त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. आता ही लक्‍झरी कार त्यांनी पूर्वी ठरवल्याप्रमाणे दैनंदिन कामासाठी वापरता येणार नाही. ही कार खूपच फॅन्सी आहे. तसेच खूप उंच असल्याने सलमा खान यांना कारमध्ये बसणे आणि बाहेर पडणे अवघड व्हायला लागले आहे. मात्र आईसाठी कार घेणाऱ्या सलमानने त्याचा विचार केला नव्हता. सध्या “भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेला सलमान पुढच्या महिन्यात “दबंग 3’च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
4 :heart:
5 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
3 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)