सलमान खानचा बर्थ डे फार्म हाऊसवर साजरा

बॉलिवूडचा सुलतान अर्थात सलमान खानचा 53 वा वाढदिवस त्याच्या फार्म हाऊसवर साजरा करण्यात आला. बुधवारी रात्रीच काही मित्र आणि नातेवाईकांसह सलमान आपल्या फार्म हाऊसवर पोहोचला आणि मध्यरात्रीच्या सुमारास भाचा आहिलबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी अगदी मोजके मित्र आणि काही नातेवाईकच त्याच्या समवेत होते.

सलमानचा भाऊ अरबाझ आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया, सोहेल खान, मेव्हणा आयुष शर्मा, दिया मिर्झा, कृती सेनन, संजय लीला भन्साळी, सतिश कौशिक, अमृता अरोरा, अनिल कपूर, सोनू सूद आदी सेलिब्रिटी आले होते. त्यांच्या समवेत रात्री उशीरापर्यंत मौज मस्ती करून सलमानचा वाढदिवस साजरा झाला. सलमानने स्वतः सुष्मिता सेनबरोबर डान्सही केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिसेंबरचा महिना सलमानच्या कुटुंबीयांसाठी खूपच खास असतो. या महिन्यात त्याच्या कुटुंबातील अनेकांचे वाढदिवस असतात. संपूर्ण खान कुटुंबासाठी डिसेंबरचा महिना एक उत्सव असतो. सलमानचे “ट्युबलाईट’ आणि “रेस 3′ विशेष चालले नाहीत. पण तरिही त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. पुढच्या वर्षी त्याचा “भारत’ येतो आहे. त्यामध्ये या दोन्ही सिनेमांच्या अपयशाची भरपाई होईल, अशी त्याच्या फॅन्सची आशा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)