सलमान खानने स्विकारले भाजप नेते किरेन रिजीजू यांचे चॅलेज 

‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात अभिनेता सलमान खान सध्या व्यस्त आहे. सलमानला केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी फिटनेस चॅलेज स्विकारण्याचे अाव्हान दिले होते. त्यांनतर सलमान खान याने शनिवारी ते आव्हान स्विकारत व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर प्रसिध्द केला आहे.

सलमान खान याने किरेन रिजीजू यांनी दिलेले आव्हान स्विकारत एक व्हिडीओ प्रसिध्द केला आहे. सलमान खानने जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ प्रसिध्द केला आहे. व्हिडीओच्या शेवटी त्याने ‘हम फिट तो इंडिया फिट’ असे देखील म्हटले आहे. तसेच त्यांनी या अभियानाचे कौतुक देखील केले आहे.

-Ads-

‘हम फिट तो इंडिया फिट’ हे फिटनेस संदर्भातील अभियान क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी काही दिवसापूर्वी सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत अनेक बाॅलिवूड अभिनेते, खेळाडू तसेच राजकीय नेते यांनी फिटनेस चॅलेज स्विकारले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)