सलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट 

अली अब्बास जफर यांच्या “भारत’ चित्रपटात सलमान खान मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. सलमानसोबत कतरिना कैफ नायिकेच्या भूमिकेत झळकणार असून काही महिन्यांपासून हा चित्रपट कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. आता सलमाना खानने या चित्रपटातील पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम हॅडलवर चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला आहे. यात कतरीनासोबत तो स्वतः दिसत आहे. हे दोघेजण वाघा बॉर्डरच्या गेटसमोर उभे असल्याचा फोटो आहे. या फोटोत कतरीनाने साडी घातील असून शॉल ओढलेली आहे, तर सलमान नेव्ही ब्ल्यू कलरच्या सूटमध्ये दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, “भारत’मध्ये प्रियंका चोप्रा मुख्य नायिकेची भूमिका साकारणार होती. मात्र, चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच प्रियंकाने चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर प्रियंका ऐवजी कतरीना कैफला ही भूमिका देण्यात आली. या चित्रपटात सलमान-कतरीनाशिवाय दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर आदी कलाकारांची मायंदळी आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)