सलमान खानच्या आगामी “नोटबुक’चा टीझर आज रिलीज झाला. यातील “मै तारे’ या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे सलमानने स्वतः गायले आहे. सलमान स्वतः पार्श्वगायन करू शकतो, ही बात त्याच्या फॅन्ससाठी खूपच आनंददायक आहे. सलमानने त्याच्या फॅन्सना एक आर्श्चर्याचा धक्क दिला आहे.
ब्लॅक लेदर जॅकेट अणि ब्लॅक जीन्स घालून जंगलातून हे गाणे गाताना सलमान या टीझरमध्ये दिसतो आहे. या गाण्यात सल्लू “दिल फिरभी चुपकेसे ये पुछ रहा तुमसे ए प्युआर करोगे क्या’ असे गाताना दिसतो आहे. या गाण्याला विशाल मिश्राने संगीत दिले आहे. हे गाणे आगोदर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या आवाजात रेकॉर्ड झाले होते.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी आणण्यात आली. त्यामुळे आतिफ अस्लमने गायलेले गाणे सलमाननेच “नोटबुक’मधून हटवले होते. त्यामुळे या गाण्याची जबाबदारी सलमानने स्वतःच्या खांद्यावर घेतली. मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन आणि सलमानचा लहानपणचा मित्र झहीर इक्बाल या सिनेमातून पदार्पण करणार आहेत. “नोटबुक” 29 मार्चला रिलीज होतो आहे.