“इंशाअल्लाह’मध्ये सलमान-आलियाची जोडी?

संजय लीला भंसाली हे आपल्या भव्य आणि विशालकाय चित्रपटासाठी ओळखले जातात. ऐतिहासिक चित्रपटांसह ऑफ-बीट विषय ते ज्याप्रकारे पर्फेक्‍शनसह चित्रपटात सादर करतात, ते अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातून दिसून येत नाही. गतवर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या “पद्मावत’ चित्रपटानंतर आता भंसाली सलमान खान आणि आलिया भट्ट यांच्यासोबत “इंशाअल्लाह’ चित्रपटाच्या तयारीत आहेत.

हा चित्रपट दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एक म्हणजे, या चित्रपटातून भंसाली आणि सलमान खान सुमारे दोन दशकानंतर पुन्हा एकत्रित काम करणार आहे. तर दुसरे कारण म्हणजे, आलियासोबत काम करण्याचे 15 वर्षांपूर्वीचे भंसाली यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

भंसाली हे 15 वर्षांपूर्वी बाल विवाहवर आधारित असलेला “हमारी जान हो तुम’ हा चित्रपट साकारणार होते. या चित्रपटात आलिया आणि आदित्य नारायण यांना संधी देण्याची भंसाली यांची इच्छा होती. पण काही कारणांमुळे हा चित्रपट पूर्ण होवू शकला नाही. त्यानंतर आता आलिया “इंशाअल्लाह’ चित्रपटातून भंसाली यांच्यासोबत काम करणार आहे.

“इंशाअल्लाह’ हा भंसाली यांचा ड्रीम प्रॉजेक्‍ट आहे. या चित्रपटासाठी त्यांना क्‍लासिकल डान्स येणारी युवा अभिनेत्री हवी होती. त्यानंतर संजय लीला भंसाली यांनी “कलंक’ चित्रपटाच्या टीझरमध्ये आलियाला डान्स करताना पाहिले आणि आलियाच्या नावावर त्यांनी शिक्‍कामोर्तब केला. “कलंक’मधील “घर मोरे परदेसिया’ या गाण्यात माधुरी दीक्षित आणि आलिया यांची क्‍लासिकल जुगलबंदी आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरले आहे.

दरम्यान, सलमान खानसोबत काम करण्यासाठी आलियाही खूपच उत्सुक आहे. “कलंक’, “आरआरआर’ आणि “इंशाअल्लाह’शिवाय आलिया “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)