नीरव मोदीच्या संग्रहातील पेंटिंग्जची विक्री कोटींच्या घरात

मुंबई – हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅंकेतील 2 अब्ज डॉलरच्या मनी लॉंडरिंग प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदी याला इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर आयकर विभागाने नीरव मोदीच्या संग्रहातील एकूण ६८ पेंटिंग्जचा लिलाव ठेवला होता. मंगळवारी आयकर विभागाने या पेंटिंग्जचा लिलाव केला. त्यांच्या संग्रहातील ६८ पेंटिंग्ज पैकी ५५ पेंटिंग्जची विक्री करण्यात आली. मात्र,त्याच्या संग्रहातील दोन महान चित्रकारांच्या दोन पेंटिंग्ज तब्बल ३६ कोटींच्या घरात विकल्या गेल्या आहे. एक, व्ही.एस. गायतोंडे यांचं पेंटिंग्ज  ‘Untitled oil on canvas’ हे २२ कोटींना, तर राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेलं ‘The Maharaja of Tranvancore’, हे पेंटिंग्ज तब्बल १४ कोटींच्या घरात विकलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)