शहीद जवानांचे कर्ज एसबीआय करणार माफ 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 23 जवानांचे कर्ज भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) माफ करणार आहे. त्याशिवाय, सर्व 40 शहीद जवानांच्या कुटूंबीयांना विम्यापोटीची प्रत्येकी 30 लाख रूपये रक्कम तातडीने उपलब्ध केली जाणार आहे.

डिफेन्स सॅलरी पॅकेज अंतर्गत सीआरपीएफचे सर्व जवान एसबीआयचे ग्राहक आहेत. त्यांना प्रत्येकी 30 लाख रूपयांचे विमा कवच बॅंकेकडून उपलब्ध केले जाते. बॅंकेकडून शहिदांपैकी 23 जणांनी कर्ज घेतले होते. हल्ल्यामुळे सर्व देश हळहळल्याच्या पार्श्‍वभूमीवर एसबीआयने शहिदांसाठी विशेष पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. शहिदांच्या कुटूंबीयांना स्वेच्छेने आर्थिक मदत करण्याचे आवाहनही बॅंकेकडून इतर ग्राहकांना करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)