सज्जनकुमार यांची कोर्टापुढे शरणांगती

नवी दिल्ली: दिल्लीत सन 1984 साली झालेल्या शिख विरोधी दंगलीच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेले कॉंग्रेस नेते सज्जनकुमार यांनी आज दिल्ली कोर्टात शरणांगती पत्करली. महानगर न्यायदंडिधिकारी अदिती गर्ग यांच्या न्यायालयात ते शिक्षा भोगण्यासाठी हजर झाले. 73 वर्षीय सज्जनकुमार यांना आजन्म कारावास झाला आहे. कोर्टाने त्यांना 31 डिसेंबर पर्यंत कोर्टापुढे शरणांगती पत्करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार ते आज तेथे हजर झाले.

त्यांनी आपली शिक्षा एक महिन्यासाठी पुढे ढकलावी अशी मागणी करणारी याचिका कोर्टात केली होती पण न्यायालयाने ती अमान्य केल्याने त्यांना शरणांगती शिवाय पर्याय नव्हता. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सज्जनकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सज्जनकुमार यांच्यावर दिल्ली दंगलीच्या काळात पालम कॉलनीच्या राजनगर भागात पाच शिख नागरीकांची हत्या केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी त्यांना ही जन्मठेप झाली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सन 1984 साली ऑक्‍टोबर महिन्यात या दंगलींना प्रारंभ झाला होता त्यात शिखांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)