सज्जनगड घाट देतोय अपघाताला निमंत्रण

कोसळलेल्या दरडींचे ढिग अद्यापही रस्त्यावरच
ठोसेघर – पावसाळी पर्यटनाचा हंगाम जोर धरत असतानाच सज्जनगड घाट व बोरणे घाट हे अपघाताला आमंत्रण देत आहेत. सज्जनगड घाटात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती.यामध्ये दरडीमधील मोठे मोठे दगड मातीचा ढिगारा घाटातील वळणावर येऊन पडला आहे सज्जनगड घाटातील रस्ता अतिशय अरुंद व तीव्र उताराचा असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महिन्याभराचा कालावधी उलटूनही रस्त्याकडेला पडलेल्या दगडी व मातीचे ढिगारा उचलला गेला नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. एखादी दुर्घटना झाल्यावर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच अजिंक्‍यतारा किल्ल्या पाहण्यासाठी आलेल्या मुंबईच्या पर्यटकांची ट्रॅव्हल्स ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रॅव्हल्स दरीत कोसळली होती या दुर्घटनेमध्य 20 पर्यटक जखमी झाले होते ट्रॅव्हल्स झाडाला धडकून थांबल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. तर काही दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात झालेल्या दुर्दैवी घटनेत 33 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

पावसामुळे कास ठोसेघर परिसरात सध्या ओसंडून वाहणारे धबधबे व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सज्जनगडावरही भाविकांची मोठी गर्दी होत आहे बोरणे घाट व सज्जनगड घाटातील धोकादायक वळणांवर कोणतेही संरक्षक कठडे किंवा रेलिंग नाहीत घाटात वारंवार दरडी कोसळणे, व झाडांचा रस्त्यात पडण्याच्या घटना घडत असतात तर मागील काही वर्षात बोरणे घाटात रस्ता खचण्याचा ही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी छोट्या-मोठ्या अपघातांना तोंड द्यावे लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहिली जात आहे का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून विचारला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्परता दाखवत त्वरित आवश्‍यक उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांमधून जोर धरत होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)