सायनाची स्विस ओपन स्पर्धेतून माघार

हैदराबाद – नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुखण्यामुळे तिला आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

तिने सोशल मीडियावर याबाबत लिहिले की, तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. सोमवारपासून माझ्या पोटात वेदना होत होत्या, पण तरिही मी ऑल इंग्लंड स्पर्धेत काही सामने खेळले. पण, आता या वेदना असह्य झाल्यामुळे आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घेत आहे. डॉक्‍टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. आशा करते की लवकरच कोर्टवर परतेन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)