सायना नेहवालची दुसऱ्याफेरीत आगेकूच 

लखनौ: सईद मोदी इंटरनॅशनल वर्ल्ड टूर 300 स्पर्धेत भारतीची फुलराणी सायना नेहवालने पहिल्या फेरीत मॉरेशियस च्या फू कून हिचा 21-10, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजयी आगेकूच करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना तिने फक्त 40 मिनिटात आपल्या नावे केला आहे.

पहिल्या सेटच्या सुरुवातीपासून या सामन्यात सैनाचा दबदबा राहिला. यामध्ये प्रथम तिन 4-1 अशी आघाडी मिळवले. त्यानंतर आपला खेळ उंचावत मोठी रॅली खेळली आणि 7-2 अशी आघाडी मिळवली. यानंतर तिने पहिल्या सेटमध्ये तिने आणखी क्रमांक खेळ कलेला आणि गुणसंख्या 12-4 अशी आपल्या बाजूने वाढवली. शेवटी पहिला सेट तिने 21-10 असा आरामात जिंकला.

-Ads-

दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडू 2-2 अशा बरोबरीवर होते. तेव्हा या सेटमध्ये कून पुनरागमन करू शकेल याचे चिन्हे दिसत होती. मात्र सायनाने लुंहा लय मिळवली आणि आपली आघाडी 9-4 अशी केली. विरोधी खेळाडूला चुका करण्यास भाग पडत सायनाने 15-5 अशी आघाडी घेत विजयकडे आगेकूच केले. शेवटी दुसरा सेट 21-10 असा जिंकत तिने सामनाही जिंकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)