सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद

कॅरोलिना मरिनची दुखापतीमुळे माघार

जकार्ता – भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिला डॉक्‍टरांची मदत घ्यावी लागली. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कॅरोलिना मरिन सामन्यात खेळू शकणार नसल्याचे समजताच तिने माघार घेतली. मात्र सामन्याचं कोर्ट सोडत असताना मरिनला आपले अश्रु अनावर झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये कॅरोलिना मरिनने चांगली सुरुवात केली होती. मरिनकडे 10-4 अशी आघाडी होती. मात्र, यानंतर रंगलेल्या एका रॅलीदरम्यान कॅरोलिना मरिन विचित्र पद्धतीने पायावर पडली. ज्यामुळे तिला पायाला दुखापत झाली आणि त्या दुखापतीमुळे तीला सामन्यातून माघार घ्यावी लागली.

कॅरोलिना मरिनला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तीला 6 ते 7 महिने खेळापासून दुर रहावे लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)