बुध्दिबळ स्पर्धेसाठी साईबाबा इंग्लिश मीडियम खेळाडूंची निवड

शिर्डी – साईबाबा संस्थान संचलित साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. सानिया पठाण, व्टिंकल लोढा अशी विद्यार्थ्यांची नावे आहे. या विद्यार्थ्यांचा साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्राचार्य असिफ तांबोळी, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र कोहकडे, नवनाथ कोते उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा कार्यालय व सारडा महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने नुकतेच जिल्हास्तरीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा 17 व 19 वर्षे वयोगट मुले – मुली गटात झाल्या. या स्पर्धेत 450 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी सानिया पठाण (9 वी) व व्टिंकल लोढा (10 वी) यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.

यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, सुर्यभान गमे, दिलीप उगले, प्राचार्य आसिफ तांबोळी, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी यांनी अभिनंदन केले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)