बऱ्याच काळापासून प्रेक्षकांना “बाहुबली’ स्टार प्रभासच्या “साहो’ चित्रपटाची आतुरता आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर चाहत्यांना ट्रेलरची आस लागलेली आहे. प्रेक्षकांना प्रभासचा दमदार लूक आणि ऍक्शन पाहून “साहो’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याचीही उत्सुकता होती. या चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे नवे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून प्रभासने प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.एका गुप्तहेराच्या भूमिकेत “साहो’मध्ये प्रभास दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तामिळ आणि हिंदी अशा 3 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
“साहो’चे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून भूषण कुमार यांची टी सीरीज आणि यूवी क्रिएशन प्रॉडक्शन प्रस्तुतकर्ते आहेत. तर, वामसी, प्रमोद अणि विक्रम चित्रपटाचे निर्माते आहे. देशात आणि देशाबाहेर हा चित्रपट चित्रित केला गेला आहे.